*भ.महावीरांच्या विचाराने आदर्श समाज रचना !*दि.26/4/2021------------------------------ भगवान महावीर जन्मकल्याणिक निमित्त त्यांच्या विचारांचे चिंतन!------------------------------ भगवान महावीर यांच्या विचाराचे काटेकोर पणे आचरण केल्यास या कोविड सारख्या महामारी मध्ये सुद्धा शांततेनं ,संयमानं जीवन जगणं सहज शक्य आहे . अहिंसा,अनेकांतवाद, अपरिग्रह, सत्य, ब्रह्मचर्य या सिद्धांतावर मार्गक्रमण करून मानवी जीवनाला समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून भगवान महावीर यांनी दिलेला हा महान संदेश निश्चितच विश्वशांतीसाठी महत्त्वाचा आणि शांततामय जीवन जगण्यासाठी तितकाच उपयुक्त आहे . भोगवादापासून, भौतिकवादापासून, चंगळवादापासून दूर राहण्यासाठी भगवान महावीर यांनी सांगितलेला अपरिग्रह महत्त्वाचा . कोरोनाने ग्रस्त असलेल्या लोकांना इंजेक्शन साठी करावी लागणारी वणवण.....! हा काळ्या बाजारापासून परावृत्त करण्यासाठी अपरीग्रह खूप महत्त्वाचा आहे. आज संपूर्ण विश्व अशांतीमय अस्थिर, अस्वस्थ झाले आहे .याचे प्रमुख कारण म्हणजे पर्यावरणाचा वाढता -हास! प्राण्यांची होणारी अमानुष हिंसा!!मानवाने जणू पर्यावरणाला ओरबडून काढले आहे. म्हणूनच कोरोना सारख्या रोगाने मानवाला घरात बसविले आहे.आणि निसर्ग अगदी मस्तआनंदाने बहरत आहे.अशा या प्रसंगी भगवान महावीरांचा अहिंसेचा संदेश फार मोलाचा आहे. आज जन्म कल्याणी निमित्त त्यांची तत्वे आचरणात आणणे म्हणजे स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवू पुढच्या पिढीसाठी सुद्धा त्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. हिंसेकडून अहिंसे कडे, शत्रुत्वात मैत्रीकडे, विषमतेतून समतेकडे हा जीवनाचा प्रवाह खूप महत्वाचा आहे. त्याचे पालन-पोषण प्रत्येकाने केले तर जीवनाला सुंदरतेचे आणि सामर्थ्याचे उदात्ततेचे प्रतिष्ठान मिळते. हा क्रांतिकारी विचार भगवान महावीरांच्या प्रतिभेचा व संयमी जीवनाचा अविष्कार आहे. ज्ञानेश्वरमाऊली, श्री संत कबीर,महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, दलाई लामा,चक्रधर, बसवेश्वर,येशूख्रिस्त, गौतम बुद्ध, मदर टेरेसा या सर्व महापुरुषांना अहिंसेच्या विचारांनी प्रभावित केले.जगताना ऑक्सिजन जितका महत्त्वाचा तितकेच अहिंसेचे तत्त्व महत्वाचे आहे. हे तत्व जगाला आपल्या विचारातून व आचारात त्यांनी पटवून दिले आहे. आज कोरोना मध्ये अनेक लोकाचे जीवन ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्याने संपताना आढळून येत आहे. तद्वत जीवनातील अहिंसेचे तत्त्व कमी झाले की माणूस जिवंत असूनही मेल्यासारखा जीवन जगेल. त्यासाठी त्यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या पंच व्रताचा आधार घेऊन जीवन मार्ग निर्धारित करू समाजाला संयमाने जगण्यासाठी प्रेरित केले आहे. महात्मा गांधीजी आपल्या पुस्तकात एका ठिकाणी म्हणतात "भ. महावीरांच्या अहिंसेच्या तत्त्वामुळे त्यांचे नाव विश्ववंद्य झाले आहे." भगवान महावीर आणि अहिंसा एक रूप आहेत. भगवान महावीरांचे स्मरण म्हणजेच अहिंसेचे स्मरण होय. 'जगा आणि जगू द्या' याचा विचार करत असताना असे लक्षात येते,पर्यावरण सृष्टीतील प्रत्येक घटक एकमेकांस पूरक व उपयुक्त आहे. हा प्रत्येक घटक सुसंस्कृत, सुनियंत्रित एकमेकांस पूरक असाच त्याचा व्यवहार निसर्ग नियमानुसार आहे. चीन देशात अमानुष व्यवहार म्हणजे "वटवाघुळ खाऊ कोरोना विषाणूचा विळखा खूप काही सांगून जातो." म्हणूनच भगवान महावीरांनी 'परस्परोपग्रहो जीवानाम् ' हे जगण्याचे सत्व सांगू सृष्टीतील प्रत्येक घटकाने कसे वागावे हा मोलाचा संदेश दिला. या नियमानुसार निसर्गातील प्रत्येक घटक सुरळीत जगत आहे.भगवान महावीर म्हणतात,"सर्वांना चांगल हव.वाईट कोणालाही नको असते. प्रत्येक जीव बरोबरची वागणूक माणुसकीला धरून असावी. कोणत्या ही जीवाला दुखवू नये. तुम्ही जर दुसऱ्याला दुखविले तर निसर्गतः व्यवहाराचा न्याय 'जसे पेराल तसे उगवेल'. म्हणून चांगले वागा म्हणजे कोरोना सारखे महामारी चे प्रसंग उद्भवणार नाहीत. आताच्या परिस्थितीला आवश्यक असणाऱ्या तत्वांचा उपयोग महत्त्वाचा असून तो अंगीकारल्यास भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळेल. पुन्हा एकदा जगाच गोकुळ होईल.सौ.सुरेखा प्रकाश कटारिया-मा.उपप्राचार्या भारतीय जैन संघटना पिंपरी पुणे 18

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड