नवा अर्थ जगण्याला ----------------------------- 30/12/2021 ----------------------------- सुरेखा कटारीया ----------------------------- वर्तमानात नवा रंग भरला, जुन्या रूढीशी थोडे हसून घ्यावे, नवा अर्थ आला जगण्याशी.! सदा क्षीतिज खुणावते, जगणे अभाशी टेकलेले आकाश जणू, उद्याच्या स्वप्नराशी .! भौतिक सुखामध्ये, मानवतेची तत्वे गहाण टाकण्याशी असे अभासी सुख जणू उजळते स्वतःशी...! वेदना घेऊनी जावे,आनंदाच्या घरादाराशी नको जगणे दुःखाचे,राहू आनंदी जगाशी.! रंग निःस्वार्थाचा, ना छेदेल काम क्रोध मनाशी सारून चिंता,बेधुंद रंगाने भारू या तनाशी.! सुखदु:खे समभावाने, झेलण्या महत्व कोरोना या वर्षाशी रात्रीच्या काळोखात, उगवेल रुपेरी पहाट उध्याशी..!

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड