- *संवाद लेखन* दि.9/10/2021शाळा, विद्यार्थी आणि वर्ग शिक्षक----------------------------- डॉ. श्वेता राठोड------------------------------ *वर्ग शिक्षक* - या या मुलांनो, तब्बल दोन वर्षानी भेटत आहोत.तुमच्या सहवासा शिवाय हे दोन वर्ष म्हणजे जणुवीस वर्षे उलटल्या सारखे वाटले रे..! काय मुलांनो, किती उंच झालात हो...! अन् अंगानं ही चांगलचं...!! *विद्यार्थी*- काय करणार आम्हाला सुद्धा आपली खूप आठवण येत होती बरं ..! एकदाचा तो कोरोना आटोक्यात आला. खूप कंटाळा आला होता घरी बसून!पण काय करणार? *वर्गशिक्षक* - हो ना!सर्वांनाच या कोरोना महामारीन घरात डांबून ठेवलं होतं! "बरं का मुलांनो! अशीच मागच्या शतकांमध्ये प्लेगची साथ येऊन गेली. घरातली एकापाठोपाठ एक माणसं जात होती. प्लेगच्या साथीने अगदी तशीच अवस्था झाली होती आता सर्वांची...! तुम्हाला काय शाळा नाही,गृहपाठ नाही अभ्यास नाही! त्यामुळे ...! *विद्यार्थी*- अहो सर काही तरीच काय ? सर, सुरवातीला खूप मजा वाटली, उशिरा उठायचं, मनाप्रमाणे वागायचो. सगळ्या कामवाल्या घरात नसल्यामुळे आईची होणारी त्रेधा पहिली आणि ठरवलं आईला घर कामात मदत करायची. पहिल्यांदा तर आई खेळायला सुद्धा पाठवायची नाही! *वर्गशिक्षक*-बरोबरच होतं आईचं! हो आपल्या आईच्या कामाची, तिला होणाऱ्या त्रासाची जाणीव तुम्हाला या निमित्ताने झाली बरं...! किती करत असते आई आपल्यासाठी...!! आणि छान हो तुम्ही आईला मदत केली हे ऐकून मला खूप बरं वाटलं. असं वाटलं की आम्ही केलेल्या संस्काराचं संस्करण..! खूप शाब्बास की तुम्हाला मुलांनो **शाळा*- मुलांनो घरात आई ,बाहेर शाळा, आपले शिक्षक,वर्गशिक्षक, खरोखरच आपल्या प्रगतीसाठी खूप काही करत असतात.तुम्ही नव्हता ना तर मला करमतच नव्हतं. सारं सारं सूनं.! वर्ग सुने ,फळा सुना, खंडू तर रडायलाच लागला. काय करावे मला कळेना ...!तुम्ही आलात खूप छान झाले हो..!!!आता घाबरू नका. अंतर ठेवून बसा. तोंडाला मास्क लावा .आणि हो जेवणाची सुट्टी झाली की, जेवणापूर्वी सॅनिटायझरन हात धुवायला विसरु नका बरं..! हे मी सारं पाहिला आहे माझ्या डोळ्यानं कारण कोरोना ग्रस्तांच्या लसीकरणाचं काम या तुमच्या शाळेत झालं बरं म्हणून मला सारे ठाऊक आहे . *विद्यार्थी*- हो अगं, कोरोना हा रोग चीनमधून आला. म्हणे वटवाघुळ मारुन खाल्ल्यामुळे हा रोग पसरला. आपण अहिंसेचे पालन करणारे भारतातले लोक तुझ्याचं शाळेत बसून वर्ग शिक्षकांनी आम्हाला अहिंसेचे धडे दिले. अशी हिंसा स्वतःच्या हिंसेला कशी कारणीभूत ठरते. हो ना सर ? *वर्गशिक्षक*- अगदी बरोबर मुलांनो! जसे पेराल तसे उगवते बाभूळ पेरून त्याला आंबा नाही येणार. आंबा पेरला तर आंबाच येईल लक्षात ठेवा. संत कबीर दासांनी सांगितलेलं *कर भला तो हो भला* *विद्यार्थी*- सर अगदी बरोबर आहे हे पटतय आम्हा सगळ्यांना *वर्गशिक्षक*- हो ना समाजामध्ये संस्काराचा संस्करण होऊन समाज जागृती झाल्यामुळे खूप अपप्रवृत्तींना आळा बसतो *शाळा*- मुलांनो आता शाळा पूर्वी प्रमाणे सुरू होत आहे .तुमचा तो आवाज, तुमचा दंगा तुमची मस्ती, खोडकरपणा आणि त्याच बरोबर तुमचा होत असणारा अध्यात्मिक, बौद्धिक, संस्कृती, शारीरिक विकास देश उभारणीसाठी खूप महत्त्वाचा आहे. **वर्गशिक्षक*- आता शाळा सुरू आहे. आजचा शाळेचा तुमचा पहिला दिवस. खूप आनंदात...! तेवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा वाजली आणि मुलांनी पळsss ठोकला. तो हात धुण्यासाठी आणि अंगत पंगत करून जेवण्यासाठी..! सर मनाशीच पुटपुटत होते. मुलांना ऑनलाइन शिकवताना काही मजा येत नव्हती. मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून...! मुलांच्या शाळा सुरू झाल्याचा आनंद मनातल्या मनात व्यक्त करत सुटकेचा श्वास सोडत ,सर ही जेवणासाठी स्टाफ रूम मध्ये निघून गेले. निर्जीव असणारी शाळा सजीव झाली आणि ती ही मोहरून गेली.हरकून गेली.9822745030

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड