*निकल भुवा भतिजी आयी...!*१३/८/२०२१ ------------------------*रक्षाबंधनाच्या निमित्ताने**लेखन .प्रा सुरेखा कटारीया चिंचवड पुणे* . राजस्थान मध्ये रक्षाबंधन अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा सण तर महाराष्ट्रामध्ये भाऊबीज अतिशय महत्त्वाचा सण! या दिवशी बहिण भावाला राखी बांधते व बहिणी-बहिणी सुद्धा एकमेकांना राखी बांधतात आणि एकमेकाच्या वेळप्रसंगी उभा राहण्याच्या जणू अणा भाकाच देतात. सर्व रक्षाबंधन सण अतिशय उत्साहात साजरे करतो. भाऊबीज आणि रक्षाबंधन हे सण आले म्हणजे साहजिकच बहिण-भावाच्या प्रेमाची अतुट अशी गोडी चाखायला मिळते. हे प्रेम अधिक दृढ होते आणि सासरी गेलेल्या प्रत्येक बहिणीला भावा विषयी प्रत्येक भावाला बहिणीविषयी असणारी आपुलकी प्रेम या सणा मधुन अधिकच वाढवता येते. सासरी गेलेल्या प्रत्येक माहेरवाशीणला माहेरची ओढ असतेच. मग ती कितीही ऐश्वर्यात, आरामात असो ! कितीही सुखात संसार थाटला असेल; तरी तिची माहेरची ओढ ही काही वेगळीच असते . म्हणूनच केल्या जाणाऱ्या सोळा संस्कारांमध्ये अगदी गर्भधारणेपासून, जन्मापासून, लग्नापर्यंत नव्हे तर अंतिम क्षणापर्यंत भावाचे महत्व, बहिणीचे स्व-तत्व फार मोलाचे असते. माहेरवाशीण म्हटलं की तिला माहेरची ओढ असते. आज जिचे मुलगी म्हणून माहेरात जे स्थान असते कालांतराने तिचे रूपांतर आत्या मध्ये होते. माहेरी तिची जागा त्याच घरात नव्याने उदयास आलेली [ भावाची मुलगी ] भाची घेते. मावळणीचे तिच्याच माहेरी हळूहळू तिचे महत्व कमी केले जाते . *निकल बुवा भतीजी आयी* या काळात आत्याचे आई वडील असतात, वा हे जग सोडून गेलेले असतात. परंतु त्या आत्याची नाळ माहेराला बांधलेली असते ती भाऊ आणि भाऊजयीच्या स्वरूपात पण भावाला वहीनीला मुलगी झाली की बहिणी परक्या वाटायला लागतात म्हणून मग आज घराघरांमध्ये आत्या नावाचं मायाळू नातं दुरावताना दिसतं. अन् नव्यानेच लग्न झालेल्या लेकीचा आणि जावयाचा कौतुक सोहळा आत्या विरहित साजरा होताना दिसतो. आणि प्रेमळ नात्यांच्या बंधातून, माहेरातून आत्या हे पात्र पुसट होत जाताना दिसत आहे ..! वास्तविक, आत्या ही खूपच प्रेमळ आणि मायाळू असते. तीचे माहेरच्या घरी खूप मोठे योगदान असते. माहेरच्या पडतीच्या काळात तिने कायम मोकळ्या हाताने मदत केलेली असते. आपल्या भावाच्या पाठीशी नेहमीच ती ठामपणे उभी राहिलेली असते. मी हे अनुभवलेला आहे बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं की, "जिचे आईवडील गेले तिचे माहेर गेले" हे आपली स्वार्थी वृत्ती बोलते. लेकीचे कौतुक करणे हे जरी गैर नसले तरी कधीकाळी त्याच घराची लेक असणाऱ्या आत्याला आपण का विसरत चाललेलो आहे ? विशेषतः उतारवयात तिला भावाच्या स्नेहाची आपुलकीची प्रेमाची अन जिव्हाळ्याची गरज असताना नेमक्या त्याच काळात तिला परके केले जाते .... तिचे आईवडील नसले म्हणजे तिची माहेरची साडी चोळी संपली माहेराच सारं संपलं का .... ? का... तिला खरच भावा विषयी भावजयी विषयी खरंच प्रेम नसतं का? तिला माहेरची ओढ नसते का .... ? माहेर हे एक असे ठिकाण आहे की जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत तिचे आकर्षण कमी होत नाही म्हणूनच मेल्यानंतर सुद्धा माहेरची साडी अंगावर टाकल्याशिवाय तिची अंतिम डोली उचलली जात नाही. समाजातील काही घरांमध्ये अगदी बोटावर मोजण्याइतक्या कुटुंबामध्ये आत्या या नावाचा नात्याचा सन्मान होतो; पण काही कुटुंबांमध्ये आत्या नावाच्या नात्याला ग्रहण लागलेली दिसतं...! समाजात बदलत चाललेली ही मानसिकता प्रत्येक भावाने आपल्या लेकी इतका नसला; तरी आपल्या बहिणीचाही यथोचित सन्मान करायलाच हवा ....! आणि आपल्या येणाऱ्या पिढीलाही आत्याचे महत्व सांगायला हवे ....!! कारण भावाची मुलगी ही कधीतरी आत्या होणार असते. आत्या ही तिच्या संसारात खूप मग्न झालेली आहे. तिच्याही मुली माहेरी आलेल्या असतात.सुनांना ही रक्षाबंधनासाठी त्यांच्या माहेरी पाठवायचे असते. आत्या वयोवृद्ध झाली म्हणून भावाचं प्रेम कमी होत नाही माहेरची ओढ संपत नाही. उलटपक्षी भावाबद्दल या उतार वयामध्ये अधिकच काळजी वाटते. ज्याप्रमाने द्राक्षा पेक्षा किस्मिस खूप गोड लागते याप्रमाणे तिची माहेरची ओढ मात्र कणभर सुद्धा कमी होत नाही .! ज्या घरामध्ये ती लहानाची मोठी होते. हस्ते बागडते. अंगणात ती खेळते. त्याच माहेरात तिला परकं करणं, कमी लेखन, तिची आर्थिक स्थिती नाजूक असेल; तर तिची अवहेलना करणे.हे चुकीचं आहे. जसे पेराल तसे उगवेल कारण गंमतीनं म्हटलं जातं *निकल बुवा भतीजी आहे !*लक्षात ठेवा कोरोना खूप काही सांगून गेला आहे याचा विसर पडू देऊ नका. तुम्ही किती ही समृद्ध व्हा परंतु बहिणीच्या प्रेमाशिवाय हे सारे अधुरी आहे हे लक्षात ठेवा. भगवान महावीर यांनी सांगितलेला कर्म सिद्धांत खूप महत्वाचा आहे. बाभूळ पेराल तर बाभूळ च येणार !आंब्याची कोय पेरली तर आंबाच येणार!! तर लक्षात ठेवा *कर भला तो हो भला अगर नही किया भला तो भी हो भैया का भला हे बहिणीचे आशीर्वाद निश्चित असतातच* एकूणच समाजामध्ये होत चाललेल्या परिवर्तनामुळे आणि समाजातील भावा बहिणीच्या प्रेमामध्ये अधिक आपलेपणा साठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने हा लेख प्रपंच .... ✍🏻 यामध्ये, नवीन पिढीत वावरणाऱ्या त्या आत्याच्या भाच्याची भूमिका खूप महत्त्वाची ठरू शकते. त्याने बहिणीइतकाच सन्मान आत्याचाही कारायला हवा ....!!कारण , तिलाही माहेरची ओढ असते .... अन म्हणतात ना .... "माय-बा मरो पण भाऊ भावजईच्या रूपाने माहेर उरो ....!! *शब्दांकन भाची .... प्रा सुरेखा कटारिया नात्यागोत्यातून पुसट होत चाललेलं "मावळन "नावाचं खाण तशी माती .....! प्रेमळ आत्यापात्रास....✍🏻* *सर्व बत्तीजाकडून सर्व मावळानिंना व त्यांच्या बंधूंना समर्पित*🙏

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड