गुरुची किमया------------------------------ दि.3/5/2021-सोमवार------------------------------ गुरुजी शाळेतल्या या आठवणी साठवून ठेवू आपणगुरुजी साठवणीतील आठवणी वर बोलू काही आपण.. गुरुजी लसावी मसावी शिकताना पाने उलटतानापाना फुलांसवे डोललांत आमच्या बरोबर आपण..गुरुजी चंदन होऊन जगला तुम्ही आमुच्या साठीदेशाचे पाईक होऊन सतत कार्यमग्न असतो आपण..गुरुजी महावीर बुध्द शाहू फुले तुम्ही दाखवलेत्या संस्काराच्या धर्म मैत्रीच्या संयमी वाटांवर चालतो आपण..गुरुजी चंद्र सूर्य तारे वारे दहा दिशांना फिरविलेकर्ता कर्म स्वल्पविराम पूर्णविराम दाखविले आपण..गुरुजी लालदिव्याच्या गाडीत फिरतो आहेहात आकाशी पोहचले तरी पाय जमिनीशी ठेवतो आपण..पाहून प्रगती गुरुजी आनंदाश्रू घळघळ लागे वाहूतेव्हा नकळत गच्च मिठीमध्ये गुरुशिष्य असतो आपण..गुरू-शिष्याच्या बंधा मधूनी उसाचा गोडवा साकारतोगुरुजी साठवणीतील आठवणी वर बोलू काही आपण..प्रा. सुरेखा कटारीया. चिंचवड पुणे ते 33

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड