*पिंपरी-चिंचवड साहित्य मंच पत्र लेखन उपक्रम* हरवलेल्या मोबाईलला पत्र ५/७/२०२१बरं का? मोबाईल शाळेत नेहेण्यास आम्हा मुलांना होती बंदी, म्हणे त्यामुळे एकाग्रता भंगीमोबाईलच आता शाळा चालवतोय,लक्षात असू द्या प्रत्येकाची बदलते परिस्थिती जीवनात कधी न् कधी येते संधी...प्रिय माझ्या मोबाईला हरवलास कुठे रेss? कसं शोधू समजत नाही मला रेs?अभ्यास कसा करणार मी कसं कळत नाही तुला रेs?...हे सारं तुला पत्रांने कळवताना जीवाला होतो रेs त्रास,तुझ्यावरचं पहात होतो रेs नाटक पिक्चर खास ...गुगलचे बोट धरून पुरवत होतो रेs जगभर फिरण्याची आस, हरवलेल्या मोबाईल तुला डोळेभरून पाहण्याचा लागला रेs मनी ध्यास...माझ्या मोबाईला तुझ्या विरहात किती किती रेs काळ लोटला, झूम मिटींग नाही नाच गाणं नाही म्हणून माझ्या मनी रे s हुंदका हा दाटलालिहिताना वाचताना आठव तुझा येतो अन् खुप होतो रेs त्रास, मोबाईल तुझ्यावर मैत्रिणींना भेटण्यासाठी वेड्या मनाला लागली रेs आस...मोबाईल आमचं कुठं चुकतंय हे तूच कि रेs आम्हाला सांगतोस, अन् ग्रेट याsर छान काम केलंस रेs मनापासून म्हणतोस...युट्युब व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर आपली कित्येक दिवसाची रेs मैत्री,तू केव्हा ना केव्हा भेटशील याची मला पूर्ण वाटते रेs खात्री...डोळे लावून बसलो रेs माझ्या कान्हा मोबाईला केव्हा भेटशील रेs मला पुन्हा,म्हणे! पोलिस कंप्लेंट करा तू काय केला रे असा गुन्हा...मोबाईल आता तुझे कार्य जीवनात आहे रेs खूप प्रशंसनीयया लॉकडाऊनमध्ये मानवतेचा खरा सेवक तू रेs जग वंदनीय...सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड