वर्तमानातील आईचे राजमाता जिजाऊला काव्य पत्र ३/७/२०२१ जिजाऊ पुन्हा याच! राजमाता जिजाऊ बसले हो पत्र लिहायला तुम्हाला तसा स्वराज्याचा संघर्षमय सुवर्ण भूतकाळ लागला आठवायला... स्वराज्याच्या मुक्तीसाठी घेऊन आल्या आपण शिवबा सारख्या शक्तीला काय सांगू वर्तमानातल्या ब्युटी पार्लरमध्ये वेळ घालवणार या स्त्री शक्तीच्या भक्तीला म्हणूनच बसले राजमाता जिजाऊ पत्र तुम्हाला लिहायला... राजमाता जिजाऊ माझ्या मनाची घालमेल कशी हो सांगू तुम्हाला तुमचा करारीबाणा रूजवायला हवा आजच्या मुलींना वर्तमानातल्या हर एक स्रीत्वाला शिवशाही संस्कार हवेत घ्यायला म्हणूनच बसले राजमाता जिजाऊ पत्र तुम्हाला लिहायला... जिजाऊ आत्म्याच्या महात्म्याची ओळख तुम्ही करून दिली मातृत्वाची कीर्ती चहुकडे आज ही पसरत राहिली बाल शिवबाच्या मनावर संस्कार संस्कारित राहीली तेच तेचं हवं आहे आजच्या जिजाऊला म्हणूनच बसले राजमाता जिजाऊ पत्र तुम्हाला लिहायला... काही करा राजमाता जिजाऊ तुम्ही या धरतीवर पुन्हा एकदा या तुमच्या कणखर हाताची समर्थ शब्दाची साथ आम्हांला द्या मूल्यांचे शिक्षण देऊन नीति मूल्यांचे धडे रूजवण्याला एकदाच धरतीवर या राहायला म्हणूनच बसले राजमाता जिजाऊ पत्र तुम्हाला लिहायला... सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड