*पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित.....** "विनंती विशेष" पत्र लेखन** पत्र : ८ वे* * गुरुवार दिनांक : १५ जूलै २०२१* *विषय : वाग्दत्त वधूला आईचे/वडिलांचे पत्र" *प्रिय श्वेता , तुला खूप खूप आशीर्वाद वि. वि. आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस हा वाढदिवस साजरा करत असताना मला तू आठवते ती कौमार्य अवस्थेतील श्वेता! अनेक प्रश्नाने मला भंडावून सोडणारी श्वेता!! मला आठवतंय त्यावेळी तु मला विचारलं होतं आई लग्न करायलाच हवं का गं? लग्न न करताही आपण राहू शकत नाही का? तेव्हा मी तुला म्हटलं होतं. लग्न हा शब्द अडीच अक्षरी,त्या जोड अक्षरात संलग्नता ठेवण्यासाठी प्रत्येकाचा समर्पण भाव खूप महत्त्वाचा!!! मग ते नातं सासू-सुनेचं,असो पती-पत्नीचा, ननंद भावजयाच असो. प्रत्येकाने दुसऱ्यांच्या मनाचा विचार करू समर्पित भावाने जेव्हा आपण जगतो तेव्हा लग्न या अडीच जोडअक्षरी शब्दाचा अर्थ अनुभवत असतो. आणि लग्नाशिवाय रहाणं म्हणजे अनेक येणाऱ्या प्रसंगांना सामर्थ्याने सामोरे जाऊन आपणच आपला पुरुषार्थ सिद्ध करणं...! आज तुझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तू तुझ्या परिवारामध्ये, समाजामध्ये वावरताना मला तुझ्यामध्ये आधुनिक युगातील सीतामाई दिसते. संस्कार संस्कृतीचं संस्करण करत करत स्वतःला सिद्ध करण्यासाठी तू केलेली धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी ! तुला आठवतंय तु मला विचारलेला प्रश्न..? आई स्त्रीला म्हणजे अर्थात मला ही स्वायत्तता,सुरक्षितता, संरक्षण मिळविण्यासाठी सबलीकरणाच्या नावाने तिच्यातील अनेक उणिवा शोधून तिला अबला ठरवण्याचं अनेक वेळा अनुभवलं. हे तु मला सांगितलं होतं. त्यावेळी मी तुला एकच म्हटलं श्वेता ताठ मानेनं,ताठ कणा ठेऊन जगायला प्रेरणा देणारा शब्द म्हणजे सीताचं होय. ती एक भूमिकन्या, जनक सुता,राघव पत्नी, रघुकुल स्नुषा, लव कुश माता तिची अनेक रूपे! ती आजही मला आजच्या वाग्दत्त वधू मध्ये दिसतात. स्वयम् निर्णयाने सर्वांच्या नकाराला होकारात बदलणारी व स्वातंत्र्याची किंमत ही मोजणारी ती सीता आठवली की आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक प्रसंगांना तोंड देण्याची हिंमत येते बरं! हे मी तुला तेव्हा सांगितलं होतं आणि तु ही अगदी त्याचं मनन चिंतन करून जीवनात उतरवत आहेस. श्वेता बाहेर काम करण्यास, करियर घडविण्यासाठी नकार देणाऱ्या तुझ्या घरातील लोकांना सकारात्मक बनवण्यासाठी तू डोळ्यासमोर ठेवलेलं सितेच जीवन जणू तुझ्या क्षमतेची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याचा अधिकार मिळणारी सीता आज मला तुझ्या दिसते.नकाराला धुडकावून सकारात्मक विचार केल्यास तसाच आचार बनतो. ही सांगणारी सबला सीता मला आज तुझ्या दिसते. श्वेता तू निलेश जावया बरोबर पती हा परमेश्वर देव नसून तो एक सखा,सहचर,मित्र, सवंगडी, स्नेही, आयुष्यभर सोबत करणारा तुझा सांगाती यादृष्टीने जेव्हा वागते तेव्हा मला असं जाणवतं लैंगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणारी आजच्या युगातील तुझ्या दिसणारी ती सीता! या एकविसाव्या शतकातही आई,बाई, माई, मॉ, मम्मी, मॉम या भूमिका बजावत असताना लवकुशा मध्ये अश्वमेध यज्ञाची ताकत यावी म्हणून आनंद, ओजस, निमांश क्षितिज एवढेच नव्हे; तर अनेक बालकांच पालकत्व स्वीकारताना मला तुझ्या मध्ये आजची सीतामाईच आढळते. श्वेता एवढं जरी असलं तरी स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्री चळवळीचा प्रचंड उत्साह,दुर्दम्य, इच्छा शक्ती, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सु संस्काराची पेरणी करत आजची आई 'श्याम घडवत आहे' या तंत्र युगामध्ये हे घडविण्याचे महत्त्वाचे आव्हान आजच्या मातांकडे आहे. श्वेता मागच्या पिढीतील ज्येष्ठांचा, आधुनिक पिढीतील मुलांचा समन्वय साधण्याचा कार्यभाग स्री नावाचा पुल करत आहे.हे सारं करताना निश्चितच तिची ससेहोलपट होत आहे श्वेता! हे मी मुद्दाम या पत्रातून तुला कळवीत आहे. कितीही कठीण प्रसंग जीवनात आले तरी डगमगून न जाता त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सुसज्ज राहते. तद्वत साऱ्या माझ्या मुली या विचारासाठी प्रवृत्त होणे महत्त्वाचे कारण रुढी-परंपरांचा पगडा हा प्रत्येक धर्मातील खाजगी जीवन नियंत्रित करणारे धार्मिक कायदे, समान नागरी कायद्याचा ही जाणीवपूर्वक पुरुषी मानसिकतेने केलेले दुर्लक्ष, कौटुंबिक समस्या, नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न यासारख्या समस्यांना पोरी तुम्हाला तोंड द्यावे लागते. पोरी यावर एकच उपाय म्हणजे शिक्षणाबरोबर अध्यात्मिक बैठक महत्त्वाची होय. लक्षात ठेव रात्रीनंतर दिवस उगवतो. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतच असतो. सारी सृष्टी हिरवीगार करून सोडतो तद्वत परिवर्तन हा निसर्ग नियम आपल्यालाही लागू पडतो. असो!आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त तुमचे वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन, पारिवारिक जीवन भरभराटी होवो! तुला आशीर्वाद देते सुरेख रे- खेने तुझ्यामध्ये श्वेत रंग भरून प्रकाश किरणांनी अज्ञान अंधकार दूर करण्यासाठी तू नीलांबरी असणाऱ्या निलेश च्या जीवनात दुधात साखर घातल्याप्रमाणे स्वतःच अस्तित्व विसरून कुटुंब व्यवस्था विस्तारित आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा देते लिहायला बसलं की लिहीतच राहावं असच वाटतं. हा पत्रसंवाद तुझ्या भावी आयुष्यासाठी आणि तुझ्या सारख्या अनेक माझ्या लेकींसाठी....! कळावे आपल्या सर्वांची आई सुरेखा सुरेखा प्रकाश कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड