*शब्द पूजा*आज मला आपणाशी संवाद साधताना आनंद वाटतो. शब्दांची पूजा करणारी आमची स्वानंद सखी, धडपडणार व्यक्तिमत्व! " *कवयित्री सौ. कल्पनाताई चांदमलजी बंब यांचा कांचन संध्या हा काव्यसंग्रह*" माझ्या हाती आहे. तो वाचत असताना त्यांच्या संवेदनाक्षम मनाने अनेक अलगत असे क्षण कवितेतून टिपण्यांचे काम केले आहे.एक स्त्री घर संसार नाती,गोती, पोती सर्व जपत फावल्या वेळेत स्वतःचे छंद जोपासत असताना लेख, कथा लिहिता लिहिता जवळ जवळ त्यांनी सातशे कविता लिहून साहित्य क्षेत्रामध्ये भर टाकली आहे. संवेदनाक्षम असणाऱ्या या 'प्रीतीच्या झुल्यावर' या कवितेत त्या म्हणतात," बघताच क्षणी मनात भरला उंच चौरस कपाळ राजपुत्र भासला"प्रेमाचं दुसरे रूप म्हणजे स्वप्न! स्वप्नालाही जीवनामध्ये महत्वाचं स्थान देऊन प्रेमाबरोबरच प्रेमाचे स्वप्न पाहणे हा ती कवयित्री कल्पना ताईंचा आवडता छंद! प्रेमात,वासल्यात अखंड बुडालेल्या असल्या तरी आजूबाजूचे भान ठेवून विसाव्या शतकातील सासु सुनांचा संवाद'खट्याळ सासू नाठाळ सून' या कवितेतून साधला आहे.निसर्गात रमताना आकाश,सूर्य, चंद्र,तारे, रात्र, दिवस अगदी सारे हे 'स्पर्श चांदण्या' काव्यामध्ये आपले भाव व्यक्त केले आहेत. आयुष्याच्या या सोनेरी संध्याकाळी 'शब्दाची किंमत' या कवितेत त्या म्हणतात "शब्द शब्द शब्द शब्द अनमोल! जपावेस बोल जीवनात!या अभंगात त्यांनी माणसाच्या बोलण्यांवर असणारी दृढश्रद्धा आणि त्यानुसार जगणं म्हणजे नात्याची वीण शब्दामुळे घट्ट,गोड, रेशीम दोरी सारखी शब्दाने सांधून ठेवता येते. त्यासाठी त्या म्हणतात,"शब्द हे अनमोल आहे ते जपून वापरा. अशा अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. महिलांवर होणारे अत्याचार 'मुली बद्दलची विचारसरणी' या कवितेच्या माध्यमातून विचार मांडले आहेत. स्वतःमधील असणाऱ्या 'तिला' त्यांनी प्रगल्भतेच्या जाणिवेने मोकळे आकाश दिले आहे. हे आकाश पेलण्याचे सामर्थ्य त्यांची मुलं,सुनां,मुली,जावई, नातू आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे साथीदार चांदमलजी बंब व स्वानंद सख्यांनी साथ दिली, असे त्या नेहमीच म्हणत असतात. स्वानंद महिला संस्थेमध्ये सहभागी असणाऱ्या अनेक कवयित्रीपैकी या एक प्रगल्भ जाणिवेच्या कल्पनेत "कल्पक सुविचाराने" समाजातील विविध घटकांचे निरीक्षण करून सतत लिहित आहेत. त्यांच्या या काव्यसंग्रहास सर्व स्वानंद सख्यान कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत. अशाच लिहित रहा. व्यक्त होत राहा म्हणतात ना," व्यक्त व्यक्त होण्यासाठी शब्द शक्ति चा झंनकार हवा. तेव्हा लेखणीच्या होकारातून शब्द साफल्याचा ओंकार बाहेर पडतो व कांचनसंध्या सारखा काव्यसंग्रह आपल्या हाती येतो, हा काव्यसंग्रह आपणा सर्वांना आवडेल असाच आहे. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते! धन्यवाद 🌷शुभेच्छुक🌷आपलीच *सौ सुरेखा कटारिया- मा. उपप्राचार्य भारतीय जैन संघटना संतु नगर. * स्वानंद महिला संस्था *श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स नवी दिल्ली.*ऑल इंडिया कटारिया फाउंडेशन *आनंद मंगल साहित्य परिषद या सर्वांच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा!धन्यवाद!

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड