आनंदी पाऊस दि.8/6/2015 आईचा आठव येता लोचना मधुनी बरसतो पाऊस दुःखाच्या वेळी आईला भेटण्यास तरसतो पाऊसll1ll काळा कृष्णमेघ दिसता पीसासहीत मोर मोहरून येतो थुई थुई नाचत गाणी गात छम छमणारा असतो पाऊस ll2ll उमलण्या पारिजातकांस रातराणी सवे सदा असते हो घाई ब्रम्हवेळी टपटपणाऱ्या कळ्या फुलांचा बरसत असतो पाऊस ll3ll तहानलेली वसुंधरा ही पाण्यासाठी तरसत हो असता अशा वेळी वरून कृपेने ढगांमध्ये पाझरत असतो पाऊस ll4ll विरहाच्या या जगण्या मध्ये मन शोशिक होऊन जगताना प्रियजनांच्या भेटीसाठी आसुसलेला आसतो पाऊस ll5ll कवितेच्या या गाण्यां मध्ये अशी 'सुरेखा' भेटते जनाला श्रोतुवृंदाच्या टाळ्यांने बघ मंतरलेला असतो पाऊस ll6ll सुरेखा कटारीया. चिचवड, पुणे. कटारीया. चिचवड, पुणे.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड