कल्पनेचा कुंचल निसर्गाचा कल्पनेतील कुंचला फिरला की बरसती सरीवर सरी धुंद होतात रानवेली बहरल्या आम्रपाली वसुंधरा चिंब भिजली उन्मेषली काळी धरती हिरव्या रंगाने बहरली मयूर नाचरा वनी कुहू कुहू चा ध्वनी नद्या-नाले उसळती सप्तइंद्रधनूचा तो रंग त्यामध्ये आसमंत दंग पक्षाची शीळ करी भंग निसर्गतील कल्पना चंग रौद्ररूपे करी सर्वांस तंग निसर्गाच्या कल्पनेतील कुंचला फिरवला की जादुई येते वास्तवी सौ.सुरेखा प्रकाश कटारीया.पुणे चिंचवड 33

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड