जगणे सोडू नकादि.11/4/2021 --------------------------- किती सावरले किती आवरले प्रश्नांना तुम्ही मोजू नका राजकारणाने समाजकारणाला दिली सोडचिठ्ठी म्हणुनी जगणे तुमचे सोडू नकाll1ll पालकातला संपन्न शिक्षक, शिक्षकातला करुणामय पालक सर्जनशीलता सदा घडो, एकमेकांचे नाते जडो पिढी घडविताना चारित्र्य संपन्नता सोडू नकाll2ll किती गरजले किती बरसले काजळलेल्या अवकाशातील प्रश्न तुम्ही गोंजरू नका सदा जगुया सर्वांसाठी संस्कार मुळचा सोडू नकाll3ll जरी संवेदनाचा झाला -हास सुसंवादाने जिंकू सारे अविचार कसला करू नका आचारसहिंता मानवतेची कधीच तुम्ही सोडू नका ll4ll जगण्याला अर्थ प्राप्त व्हावा असे आपण सदैव करू जरी जगण्याचा सूर्य काजळून गेला तरी किरणांना आपण शोधून काढू मानवतेचा मूलमंत्र सोडू नका ll5ll सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे 33.

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड