उन्मेष



तुझ्याच मुळे प्रकाशा जीवनात वसंत फुललाllधृll

 काम हाच देव कामातील बदल ही विश्रांती यामुळे रुक्ष एकाकी खोल दरीत हास्य उमटले.
तुझ्याचमुळे प्रकाशाll1ll

जाणीवपूर्वक कर्तव्य हा नेम 
विचारांशी प्रामाणिक हे  व्रत 
त्यामुळे नंदनवन फुलले रुक्ष वाळवंटात ही ओयासिस दिसले तुझ्याचमुळे प्रकाशाll2ll

घराच्या उंबऱ्याशी, ऑफिसच्या मस्टरशी, बसच्या वेळेशी ,आईच्या कर्तव्याशी,पतीच्या प्रेमाशी,सासूसासऱ्यांच्या समाधानाशी एक रूप झाले.
तुझ्याचमुळे प्रकाशाll3ll

जीवनात फुले उमलली मुक्या कळ्या बहरून आल्या रात्रीच्या गर्भात सुगंध भरला तुझ्या बाहुपाशात रजनीला इंद्रधनू दिसला 
उन्मेषली वसुंधरा तुझ्याचमुळे प्रकाशाll4ll

अगदी व्यक्त करण्या शब्द अबोल झाले
 नेत्र ओलावून  गात्र उन्मेशले 
संसारी उपवनात सडा वसंत फुलला
 तुझ्यात मुळे प्रकाशाll5ll 

प्रा. सुरेखा कटारीया

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड