विषय : दिशाहीन युवाशक्ती कविता : धरलं तर चावतय*

*काव्यबहर साहित्य मंच आयोजित उपक्रम सामा. काव्यलेखन* 
 *दि.८/७/२५* 
 *विषय : दिशाहीन युवाशक्ती* 
 *शीर्षक :  धरलं तर चावतय* 

स्वच्छंदीपणाचे  वाहती वारे 
 दिशाहीन युवाशक्ती झोक्यात 
मनामध्ये सावळा गोंधळ
जगणे त्यांचे येती गोत्यात..१

भावनांचा नको तो पसारा
व्यसनांचे वाढत आहे वेड
पडसाद पडतात घरी दारी
संसारात निर्माण होई तेढ.. २

धरून ठेवलं तर चावी 
सोडलं तर पळून जाईल
भरकटलेली  तरुण पिढी
अशीच आहे ही तरुणाई.. ३

आधुनिक जीवनशैलीमुळे
संवाद एकमेकाचा संपला
सदा एकल कोंडे होऊन
मनो रुग्णा मध्ये गुंफला.. ४

स्वप्न पाहतात हे उंच उंच
कधीमधी घेतात हे भरारी
नसे आत्मिक अविष्कार
येतात डुलत डुलत  घरी.. ५

तू..तू..मी..मी..मध्येच
नातेगोते अडकले सारे
संपला प्रेमाचा पाझर
स्वैराचाराचे वाही वारे ..४

आजच्या युवा पिढीने
मोठ्याचा ठेवावा आदर
जगावे बिन धास्तपणे 
घेत मोठ्यांची प्रेमचादर.. ५

प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड, पुणे  ३३

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!