उपक्रम *निसर्ग काव्य*विषय:-- *वसुंधरा*

काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित 
शनिवार दि २८-६-२०२५ 
     उपक्रम *निसर्ग काव्य*
विषय:--  *वसुंधरा*

श्रावणात असा निसर्ग बहरला
हिरवा हिरवा गार घालुनी शालू
ठाकली उभी अंगणे स्वागताला
अहो लेकीबाळी येणार माहेराला

श्रावणाच्या धारेत वसुंधरा शहारली
जलसिंचने  धरा अंगअंग मोहरली
रंगी बेरंगी कातू लागली काचोळी
हिरव्या शालूची किनार सोनपिवळी. 

सर्वत्र परिमळ पसरता प्रसन्न वाटे
मन पाखरू भिर भिर  फिरत उडते
जाईजुई गुलाब चमेली फुलले ताटवे
या परिमळी तनामनाने पाखरू रमते. 

डोंगर दर्या-खोरे चुडा जणू धरतीचा
किण् किण् आवाज सुखावती कर्णा 
 वाऱ्याचे पैंजण आवाज रुणु झुणुचा
दिव्यरूप निसर्गाचे नमन तुझ्या चरणा

प्रभातकाळी सूर्य उगवला लाल लाली
जणू लाल तिलक वसुंधरेच्या भाली
चराचरातून प्रसन्न होऊनी अवतरली
पृथ्वीचे रक्षणास अंतर्यामी खून पटली

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड, पुणे  ३३.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण