काव्य बहर साहित्य मंच भंडारा मंगळवारचा उपक्रम*

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा मंगळवारचा उपक्रम* 
      *सामाजिक काव्य*
    
*विषय :- नाते समाजाशी*
मंगळवार १७/६/२०२५.

कुणाच्याही सत् विचारांना कधी तोडायचे नाही
सत विवेकी माणसांच्या विचारांना कधी खोडायचे नाही 

कुटुंब व्यवस्था चालली युगे युगे ही भारतीय संस्कृती
पाश्चिमात्य व्यवस्थेतील विकृती मला जोडायचे नाही

प्रेमळनाते  घराशी समाजाशी असूनही जरी बोलले कोणी
सज्जन माणसाने षडरिपूंना कधी अंगीकारायचे नाही

घरात समाजात पाय ओढणारे किती असले  जरी कोणी
सकारात्मकता ठेवुनी  कधीही त्यांना दुखवायचे नाही

नीती मूल्य जोपासत गेले मला वाटे मिळकतही माझी
संस्कारी तरुण पिढींनी चांगले वर्तन  सोडायचे नाही

नाते समाजाशी जोपासताना सदा मना करा रे प्रसन्न 
अखेरचा निरोप घेताना मनात कसले शैल्य ठेवायचे नाही

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे.३३.