भरारी अस्तित्वाची

परमपूज्य महासतीजी डॉ. मंजुश्री जी महाराज साहेबांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या या संस्थेमध्ये समाज उपयोगी कार्य करण्याची ऊर्जा अधिक उर्जित होते कारण स्त्री तुझ्या अस्तित्वाचे किती हे पदर...!कधी सहनशीलतेचा धागा कधी स्वाभिमानाची झालर...!ज्ञानगंगा वाहते तुझ्या अंगणी सावित्रीचे जगणे सदा ठेवत जगते अंतरी...!उजाडली ज्ञान पहाट स्व-आनंदाने ...!झगमगतो  आता तुझा थाटमाट...!  
स्वानंद महिला संस्था पिंपरी चिंचवड व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हे पंधरावे स्त्री साहित्य कला संमेलन भरविले जात आहे.सर्वप्रथम आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. ..! महिलांनी महिलांसाठी निर्माण केलेल्या ह्या व्यासपीठावर महिलांना बोलतं, लिहितं विवेक वृत्ती जागृत  करून स्व ची जाण निर्माण करण्याचे काम केलं जात आहे. 
                             हे अखिल भारतीय 15 वी स्त्री साहित्य कला  संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका मा नीलमताई माणगावे  आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ...! तर स्वागताध्यक्षपदी सौ आशाताई लुंकड आहेत. स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई बंब व सेक्रेटरी सीमा गांधी तसेच श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखेच्या अध्यक्षा पुष्पा जी गोखरू पंचम झोनच्या महिला अध्यक्ष सौ वर्षा जी टाटिया या सर्वांच हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. सांगायला आनंद वाटतो,आपल्या मा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व अनेक मान्यवरांनी स्वानंदला सदिच्छा भेट देऊन महिलांना मार्गदर्शन केले आहे. 
                           १६ मार्च २०२४ ला  भरविल्या जाणाऱ्या साहित्य संमेलनाच्या  पूर्वसंध्येला भूतकाळाकडे कटाक्ष टाकता असं लक्षात येतं खरोखरच महिलांनी  घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे. अनेक समस्यांना तोंड देत त्या  भरारी घेत आहेत. 
            सांगायला आनंद वाटतो, गेली २४ वर्ष स्वानंद संस्था पिंपरी चिंचवड मध्ये कार्यरत आहे. सुरुवातीला सहा वर्ष स्वानंद अध्यक्ष म्हणून मी काम पाहिले. त्यानंतर असं लक्षात आलं की महिलांना अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी प्रेरित करून त्यांच्यातील असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक दोन वर्षानं नवीन अध्यक्षांची निवड करून त्यांच्या पंखात बळ भरण्याचं काम स्वानंदनं केलं आहे. आज  स्वानंद च्या महिला सभासद कोणी पन्नाशीची आहे. कोणी साठीची आहे. कोणी ७५च्या आहे. एकूणच जगत असताना अनेक समस्यांवर मात करून महिला पुढे येत आहे.जशी आपली पाठ आपल्याला दिसत नाही, तसे आपले दुःख इतरांना दिसत नाहीत. दिसतं ते फक्त सुख.                                शब्द" आणि "बुद्धीने" जग जिंकता येते... पण "हृदय" जिंकायला "प्रेम" आणि "विनम्रता" लागते..!! कोणतंही सुख कोणाच्याही आयुष्यात उगाचच येत नाही तर, त्यांनी केलेल्या मेहनतीनं, कष्टातून, भोगलेल्या त्रासातून...!वाळवंटात सुद्धा ओयासिस दिसतं आणि मनाला आनंद देणारी हिरवळ त्याच्या आजूबाजूला दिसते.त्याप्रमाणे  स्त्रियांच्या जीवनात जगत असताना आनंद निर्माण  करण्याचं काम स्वानंद नं केलं आहे . श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखेने केला आहे . 
         बुरसटलेल्या घुंगटातून महिलांना बाहेर काढत असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. खूप काही भोगलेलं आहे.  त्यांना मनमोकळ करण्यासाठी स्वानंद व्यासपीठ खूप महत्त्वाचं....!दवाखाना कितीही मोठा आणि प्रसिद्ध असला तरी मनावर झालेला घाव कुठल्याही रिपोर्टमध्ये दाखवला जात नाही...!! त्यासाठी मनाच्या  तारा  जुळविणारी, माणसाची मन जाणणारे संस्था म्हणजे  स्वानंद संस्था तसेच सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन सेवा करायला सांगणारी श्री ऑल इंडिया कॉन्फरन्स महिला शाखा त्याच्या अध्यक्षा मा.पुष्पाजी गोखरू, महामंत्री- आरती  भुरट, खजिनदार- सुषमा धाकट  समाज उपयोगी  कार्य करून मानव सेवा हीच ईश्वर सेवा या  तत्त्वानुसार त्या कार्य करत आहेत. 
      तनानं, मनानं,धनानं, सेवेन ,समर्पित होऊन या दोन्ही संस्था समाजात काम करत आहेत . देव होता नाही आलं तरी माणूस होऊन बघावं. असं बीजारोपण करणाऱ्या या दोन्हीही संस्था आणि त्यांचं कार्य  आम्ही करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 
*नवं मिळालं तर जुनं अडगळीला पडतं... पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते...मग ती वस्तू असो  किंवा घरातली स्त्री असो..मोठं झाल्यावर कळत खेळणी महाग नसतात...बालपण महाग असतं.
"वेळ" फार हळू येते, जेंव्हा आपण तिची उत्कंठेने वाट पाहत असतो..
"वेळ" खूप लवकर निघून जाते,जेव्हा आपल्याला उशीर होतो..!!
"वेळ" अगदीच कमी असतो, जेव्हा आपण खूप आनंदी असतो.!
"वेळ" जाता जात नाही, जेंव्हा आपल्याला वेदना होत असतात!!
प्रत्येक वेळी "वेळ" आपल्या सोयीप्रमाणे येत नाही... म्हणून प्रत्येक वेळी आनंदी  राहून स्वानंद मिळवण्याचं काम, राष्ट्र उभारणीचे काम आम्ही महिला करत आहोत. 
आज काय समाजात पाहतोय कोणी कोणाचं कौतुक करायला तयार नाही म्हणूनच अशा  साहित्य संमेलनात विविध कर्तुत्वान महिलांना स्वानंद भरारी पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. तसेच समाजात समाज उपयोगी काम करणाऱ्या संस्थांना सन्मानित करत आहोत. एका महिला संस्थेने आमच्या बंधूंच्या पाठीवर मारलेली शाब्बासकीची थाप निश्चितच त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारी ठरते. असं म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. 
       असं जरी असलं तरी आजही महिला काही ठिकाणी दुय्यम स्थानी गणली जाते.  म्हणूनच या साहित्य संमेलनामध्ये परिसंवादाचा विषय घेतला आहे "स्त्री आजही सामाजिक, राजकीय, साहित्यिक, कौटुंबिक, आर्थिक क्षेत्रात दुय्यम स्थानीच आहे...!का...?"
पुण्याच्या अध्यक्ष रंजना लोढा म्हणतात, "स्वानंद म्हणजे मिठाईतील कलाकंद स्वानंद म्हणजे गुलाबाचा गुलकंद स्वानंद म्हणजे हातातील रत्नजडित बाजूबंद स्वानंद म्हणजे पारिजातकाचा सुगंध विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून स्वतःचा ठसा उमटवण्याचा पुरुषार्थ म्हणजे स्वानंद कर्तुत्वान स्त्रियांचे प्रतिबिंब म्हणजे स्वानंद सर्व महिलांसाठी सतत कार्य करणारं आत्मविश्वास देणारं  स्वानंद"
 श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या सर्व महिला  सर्व स्वानंद च्या सर्व महिला  आपणा सर्वांचे  पुनश्च हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. 

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!