अवतरण दिवस श्वेता
!! शुभ सकाळ !!
*श्वेता आज तुझा वाढदिवस...!वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा...!!*
. जिंकलो तर "आवरायचं" आणि हरलो तर "सावरायचं" या दिलेल्या संस्काराचे जतन करत तू आत्तापर्यंत पोहचली आहे.
. मन आणि छत्री याचा उपयोग तेंव्हाच होतो जेंव्हा ते उघडले जातात.. नाहीतर कायमच ओझं वागवावं लागतं... हे तुला चांगलेच ठाऊक आहे.
. जगताना पाहिलेल्या पावसापेक्षा अनुभवलेली पावसाळे जास्त महत्त्वाचे...! अनुभव हा माणसाचा गुरु असतो. आज आपण ज्या सर्व परिवारां बरोबर वाढलो घडलो. समंतशिखर्जी ,काशी, अयोध्या, गया,प्रयाग या भगवंताच्या दर्शनासाठी जात आहोत.
. कितीही वैभव संपन्न झाला तरी कितीही कमवले तरी तुझ्यातला महत्त्वाचा भाव म्हणजे गर्व कधीच न करता समभावाने जगत आहेस. जीवनात आलेल्या लोकांबद्दल कृतज्ञता व जगताना न आलेल्या लोकांबद्दल समता भाव हा गुण महत्त्वाचा वाटतो.
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर वजीर आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात,... हे आपणास चांगले ठाऊक आहे म्हणूनच आयुष्य खूप सुंदर आहे आपण एकमेकांना समजून घेत आहात व जीव लावत आहात .श्वेता आणि * *निलेशजी म्हणूनच आनंदी जीवन जगत आहात होकार न करायला आणि नकार हो करायला सिंहाचं काळीज लागतं ते तुम्हाकडे आहे. म्हणूनच आज तीर्थयात्रेला आमच्याबरोबर आहात.*
*जीवनात जेवनात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नाही*. हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.
जगामध्ये जगत असताना काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात, कांही माणसं गरिबीला गुलाम करतात, पण आपल्यासारखी जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं जीवनाचा खरा सन्मान करतात. त्यामुळेच निलेशजी पूर्ण तीर्थयात्रा होईपर्यंत आपण आमच्या बरोबर आहात.
श्वेता मला प्रथम आई व प्रकाशजींना बाबा बनवणाऱ्या या खास दिवसाच्या व तुझ्या अवतरण दिवसाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
. हार्दिक शुभेच्छा...!!
*शुभेच्छुक शुभेच्छुक तुझी आई सुरेखा व बाबा प्रकाश समस्त कटारिया परिवार व तीर्थयात्रेतील समस्त तुझ्या स्नेहींकडून तुला खूप खूप शुभेच्छा*🌷🌷🌷🌷
.
.