संत विनोबा भावे वर्धा - चिंतन
*आजचे चिंतन*
*संत विनोबा भावे- वर्धा*
*दि. 30/1/2023*
वर्धा अतिशय शांतताप्रिय संस्कारक्षम व संतांच्या पावन स्पर्शाने समृद्ध झालेल्या आज वर्धा मध्ये माननीय दिलीपजी प्रतिभाजी व स्वरूपचंदजी बोथरा- निर्मलाजी बोथरा एवं चंचला बाई रेहदासणी यांची लाडली तृप्तीजी संदेशजी बोथरा यांच्या घरी राहण्याचा योग आला. संत विनोबा भावे यांच्या या वर्धा मध्ये, महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये जाता आलं . त्यांचे विचार ऐकले ,वाचले आणि माझं मन अंतर्मनात डोकावू लागलं.
आपल्याला वाटतं खरोखरच आपण इतरांच्या उपयोगी पडतो. आपल्याशिवाय त्याचे नडत आहे. या विचारात असतो.
शब्द विविध पद्धतीने योजलेले असतात. वेगवेगळे अर्थ निघत असतात... आपण मात्र एकाच दृष्टीने पाहत असतो.
भगवान महावीरांनी सांगितलेला अनेकांतवाद संत विनोबांनी आपल्या आचरणात आणलेला या घरांमध्ये पाहावयास मिळाला. फुलासवे माती सुगंध तद्वत या शहरांमध्ये जाणवलेले.
येवू घातलेल्या 96 व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या पावन भूमीवर जाता आले. सर्वत्र आनंदी आनंद होता. आरशाची किंमत हीऱ्यापेक्षा नक्कीच कमी आहे.परंतु घातलेला हिऱ्याचा दागिना पाहण्यासाठी आरशाचाच उपयोग करावा लागतो . तद्वत अतिथी देवो भव या युक्तीला साजेस कृतीतून आपलेपणा दाखवणारा वर्धा शहरातील हा बोथरा परिवार. ..
विनोबा भावे म्हणतात,कसलीच लाज नसणे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे.
पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात.. त्यातली बरीच माणसं संस्काराने दरिद्री आणि विचाराने भिकारी असतात. परंतु या वर्ध्यामध्ये माणुसकीचे जतन करणारी माणसं भेटली.
भीतीतून दु:ख निर्माण होत, कोरोनाच्या काळात भीतीतून मृत्यू झालेले आपण पाहिले आहे. भीतीतून वाईट कृत्यही घडतात.
कांहीजण असेही असतात जे गरज असेल तरच आठवण काढतात..!! परंतु कधी आमची ओळख नसताना फक्त शलाकाच्या कटारिया , बंसती रायसोनीच्या प्रेमाच्या धाग्याने बांधलेल्या या दोन्ही घरांमध्ये आम्ही तत्त्वज्ञानाचा, माणुसकीचा, आपलेपणाचा, प्रेमळ,आनंदाचा झरा अनुभवला...!
यांच्याकडे पाहिलं आणि मनात विचार चमकून गेला. लोखंडी वस्तू वापरली नाही तर ती गंजते आणि वापरली तर ती झीजते... एकूणच काय *शेवट हा ठरलेला आहे* .
मग कोणाच्याही उपयोगाला न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या आनंदासाठी झिजणे केंव्हाही उत्तम ..! या संस्काराचं वाण इथे अनुभवायला आलं. अगदी नाती समवेत...!
*छत्री ही पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात उभा राहण्याचे धाडस नक्की देऊ शकते... त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते* हे विनोबा भावे यांचे विचार आहे. आज त्यांच्या आश्रमात जाऊन खूप मन शांती आणि मनाला उभारी मिळाली.
आयुष्यात शांत राहण्याचा एकच मार्ग म्हणजे... आपण ज्या गोष्टी बदलू शकत नाहीत त्या गोष्टीचा विचार करणे सोडून द्यायचे.!!
घर जळाले तर विमा आहे ..पण स्वप्नं जळाली तर काय?..
ढग बरसले तर छत्री आहे... अश्रू बरसले तर काय?...
काटा टोचला तर काढता येतो... शब्द टोचले तर काय?
वाघ अडवाआला तर पळता येतं.. अहंकार अडवाला तर काय?
शरीर आजारी पडलं तर औषधाची सोय आहे.. मनच आजारी पडलं तर काय? त्यासाठी एकच उपाय आहे... जीवाला जीव देणारी आपल्यासारखी माणसं असतील... तर हे असणं कुठल्याही गोळ्या औषधापेक्षा कमी नाही. आपल्यासारख्या माणुसकीदार प्रेमळ व्यक्तीची हाक औषधाच्या पेक्षा कमी नाही.!!
कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते .नाहीतर त्याचा डोक्यावर परिणाम होत असतो. जगणं खूप सुंदर आहे फक्त बोलण्यात मधुरता हवी प्रेमाने गोड बोला.. .फक्त माणसं जपताना त्यातली माणुसकी जिवंत ठेवा. अनेक समस्या सहज सुटतील. बोथरा परिवाराने आमचं केलेलं स्वागत अविस्मरणीय. ..! संत विनोबा भावे म्हणत
*प्रचंड आघात होत असताना सुद्धा जो आपला सज्जनपणा सोडत नाही तोच खरा - संत*...
*विनोबा भावे*
प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ते 33.
मो नं 9822745030
.
.