स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव*
11/8/2022
     
    *एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार*   
    *गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार*

 या देश स्वातंत्र्याला प्रेरणा देणाऱ्या कुसुमाग्रजांच्या काव्यातून केलेल्या आव्हानाचे सार्थक होण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला. आज 15 ऑगस्ट 2022 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. आम्ही भाग्यवान आहोत स्वतंत्र भारतामध्ये आम्ही जन्मलो. *त्यामुळे भोपळ्यात बी खुशाल आहे*. 
 भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष. *१५ ऑगस्ट 2022 हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा राष्ट्रीय उत्सव*. यंदा हा उत्सव सण घराघरातून साजरा होणार. घरा घरावर तिरंगा फडकणार. आम्ही या लोकशाहीतील सार्वभौम देशाचे नागरिक आहोत .आम्हा सर्वांच्या घरी तिरंगा फडकणार हा देशप्रेम अभिव्यक्तीचा आनंद प्रत्येक भारतीयांना  मिळणार. माननीय पंतप्रधान मोदींनी मांडलेली ही संकल्पना असंख्य बलिदानांचे, उतराई होण्याचा व त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्याचा हा अमृत योग. ...! 
  फार वर्षापूर्वी इतिहासाचा अभ्यास करताना अभ्यासलेलं म्हणजे भारतातील गणराज्य ही अत्यंत सुखी समाधानी ऐश्वर्यसंपन्न होती. या सुजलाम सुफलाम देशाची ओळख सोन्याचा धूर निघणारी भूमी असा होत होता. यामुळेच या संपन्नतेची लालच असणाऱ्या लालची परकियाची आक्रमण होवू लागली. त्याचा परिणाम  बराच मोठा काळ पारतंत्र्यात आपणा सर्वांना घालवावा लागला.  *पण अखेर तो १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस उगवला. गगनात भारतीय स्वातंत्र्याचा तिरंगा फडकला. "तिरंगा" राष्ट्रध्वज ही आमची अस्मिता. आमची सुरक्षादले सिमेवर आणि देशांतर्गतही अस्मिता राखण्यासाठी अहोरात्र कार्य मग्न असतात.*
        *भारतीय संस्कृतीत ध्वजाचे अपरंपार महत्त्व पुराणकाळापासून आहे. श्रीकृष्णानं महाभारत युद्ध जिंकून दिले,तेव्हा अर्जुनाच्या कपिध्वजाच उल्लेख आढळतो. अशाच आपल्या राष्ट्रध्वजाची कहाणी*
        *भारतीयाना स्वातंत्र्य  मिळणार आशा अशा जेव्हा पल्लवी झाल्या, तेव्हा तातडिने केवळ २४ दिवस उरले होते. ध्वज समिती नेमण्यात आली. आणि ध्वज समितीने भारतासाठी तिरंगा राष्ट्रध्वजाची निवड केली. यात प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर  या समितीत होते. तिरंगा ध्वजात चार रंग आहेत. भारताचा राष्ट्रीय ध्वज हा  केसरी, पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे. त्याच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. *
        *राष्ट्र ध्वजातील रंग हे भावना व्यक्त करतात. गडद भगवा त्यागाचे प्रतीक ,निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला, पांढरा रंग हा शांतीचे आणि हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतिक आहे.*
        *राष्ट्र ध्वज जो देशाचे सार्वभौमत्व सिद्ध करतो. राष्ट्र ध्वजाचा सन्मान म्हणजे देशाबद्दल आत्मियता, अभिमानचे द्योतक. हा सन्मान म्हणजे देशातील समस्त नागरिक देशहितास्तव समविचाराचे देशभक्त असल्याचे प्रतिक. तेव्हा देशप्रेमाच्या या अमृत महोत्सवात आपणही भाग्यवंत सहभागी होवू यात अन् घराघरात तिरंगा फडकविण्यास सिद्ध होवू या.*
        *आज हा स्वातंत्र्याचा दिवस ज्यांच्या अपूर्व त्यागामुळे लाभला .त्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वच ज्ञात अज्ञात विरांना विनम्र अभिवादन.. वंदन. करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा 🙏 हा  सोहळा तर मग चला घरावर तिरंगा फडकू या*. 

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!