शंकर भाऊंना श्रद्धांजली
दि.15 जुलै 2022, शुक्रवार
*जैन विद्या प्रसारक मंडळातील चमकता सितारा स्व. शंकर भाऊ*
*आदरणीय शंकर भाऊंच्या स्मृतींना उजाळा हीच सर्व स्वानंद महिला भगिनींतर्फे भावपूर्ण आदरांजली*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*भाऊंच्या जगण्याकडे एक कटाक्ष टाकता असे लक्षात येते, की भाऊंची जगण्याची कला संस्कारावर संस्कृतीचं अंदन देणारा होती व आहे. म्हणूनच आम्ही साऱ्या स्वानंद भगिनी जीवनाकडे सकारात्मकता दृष्टिकोन ठेवून जगत आलो आहोत . जीवनात भेटलेल्या अनेक संस्था, संस्थेतील माणसे परिवारातील नातेवाईक, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन जगणं समृद्ध व प्रगल्भ होत गेलं.
यातील महत्त्वाची संस्था म्हणजे *श्री जैन विद्या प्रसारक मंडळ ..! या शैक्षणिक वृक्षाचा वटवृक्ष बनवण्याचा मानबिंदू आपणाकडेच जातो. परंतु कसल्याही गोष्टीचा अहंभाव न ठेवता समाज विकासासाठी केलेले हे आपलं कार्य सदैव आम्हा समोर उभं राहतं.आणि मग ही प्रगल्भता येते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो. घडुन गेले ल्या प्रसंगाचे अवलोकन करण्याची सवय भाऊ आपणच आम्हाला लावली. हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता आपल्या सहवासामुळेच, आपल्या शिकवणीमुळेच आम्हास जडली .त्यामुळे क्षमा विरस्यभूषणम या तत्त्वावर दृढ विश्वास बसून. माफ करण्याची वृत्ती वाढत गेली*
*अनेक कारणाने येणारा क्रोध क्षमावल्याने मनःशांती मिळायला लागली. कशाचेही काही वाटेनासे होऊ लागले . घडलेले चांगले की वाईट हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लाउन घ्यायची ह्याचे जणू काही प्रात्यक्षिकच आपण आम्हाला दिले. नेहमी स्वानंदने आयोजित केलेल्या ध्यान शिबिराला, स्त्री साहित्य कला संमेलनामध्ये ग्रंथदिंडीच्या पूजनासाठी व नवकार महामंत्राच्या जपाच्या वेळी आपली आवर्जून हजेरी असत. आल्यानंतर आपण आम्हाला म्हणायचा, *एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता आलं पाहिजे. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे? ती महत्वाची आहे का? आपल्या मताची गरज आहे का? हे सगळे समजून घेता आलं पाहिजे.फक्त स्वतःचा स्वार्थ पाहून येणारी माणसे ओळखण्याची कला भाऊ आपणच आम्हा शिकविली.* कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील भावनिक गुंतवणूक कमी करून तटस्थपणे जगता यायला हवं हे आपणच सांगितलं .त्यामुळे तटस्थता येते. सुंदर जीवन जगण्याची उर्मी भाऊ आपण दिली.आपल्या आजुबाजुचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जगणं जास्त सुंदर होतं.जग जास्त सुंदर दिसायला लागत.खरं म्हणजे ते सुंदर होतच पण
ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते. कारण आता कसलही ओझं डोक्यावर राहत नाही .कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे होऊ शकत नाही.पण दूर राहून ती करू शकतो. हे अनुभवायला येते.
*ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो. त्या गोष्टी किती फोल होत्या हे कळत गेले. त्यामुळे आत्मपरीक्षण केले जाऊ लागले. नव्या आयुष्याला सुरुवात होऊ लागली. या आपल्या, विशाल सकारात्मक दृष्टिकोनने व महिलांची शक्ती वाढवण्यासाठी आपण केलेलं कार्य वर्तमानतील प्रतिकूल परिस्थितीत भ.महावीर स्वामीच्या समताधारी तत्त्वाचे केलेले पालनच होय. जीवन जगत असताना काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. याचं प्रात्यक्षिक म्हणजे आपलं जगणं व आपलं सांगणं.*
*त्यामुळे आमच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागली आहे. खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत . प. पू. गणेशलालजी महाराज साहेबांचा ,आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेबांचा भाऊ आपणास सतत सहवास व सतत आशीर्वाद मिळाला व आपला सहवास आम्ह महिला वर्गास मिळाला.
आपला , प्रत्येक सदविचार आम्हास आजही खूप प्रेरणादायी कार्य करण्यासाठी उपयोगी पडतो.तो म्हणजे एकमेकांना अडचणीत आणण्यापेक्षा सतत कार्य मग्न राहून एकमेकांना जमेल तेवढी मदत करण्याची आपली शिकवण आम्हा महिलांच्या जीवनात खूप उपयुक्त ठरली. हे सगळं करत असताना आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला जमत नसेल तर निदान गप्प बसा.नको त्या उठाठेवी करण्याचे टाळा. भाऊ हे आपले अनमोल बोल फार महत्वाचे असून सकारात्मक व आनंदी जगण्यासाठी आम्हा सर्वांच्या जीवनात सकारात्मक प्रकाश किरणाने जगण्याची उर्मी देण्याचे काम करत आहे.
आयुष्यभर जैन विद्या प्रसारक मंडळाला दिलेले आपले योगदान अविस्मरणीय असून सदैव मानवतेची रुजवण करणार आहे .स्वार्थ व अहंकार कधीही मनात न ठेवता आपण केलेलं कर्म खूप काही सांगून जाते. आज आपला स्मृती दिवस अनेक आठवणींचा हलकल्लोळ😰 मनामध्ये दाटून येतो. आपण जेथे असाल तेथे आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो... हीच प्रार्थना
श्राविका
प्रा. सुरेखा प्रकाशजी कटारिया एवम *समस्त स्वानंद महिला संस्था, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नई दिल्ली, भारतीय जैन संघटना, ऑल इंडिया कटारिया फाउंडेशन, श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट व समस्त महिला वर्गाकडून भावपूर्ण आदरांजली* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷दि.15 जुलै 2022, शुक्रवार

प्रा. सुरेखा प्रकाशजी कटारिया एवम *समस्त स्वानंद महिला संस्था, श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नई दिल्ली, भारतीय जैन संघटना, ऑल इंडिया कटारिया फाउंडेशन, श्री आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट व समस्त महिला वर्गाकडून भावपूर्ण आदरांजली* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷