Posts

Showing posts with the label बातमी लेखन रंग गुलु गुलु बोलूची

, लेखन रंग गोलू गोलू बोलू व बडबडगीतांच्या अल्बम चे प्रकाशन बातमी

*लेखनरंग गुलुगुलु बोलू व बडबडगीतांच्या अल्बमचे प्रकाशन*   *स्वअभिव्यक्तीतून स्त्री घडत जाते!" - डॉ. संगीता बर्वे* पिंपरी (दिनांक : ११ जुलै २०२२) "अध्यात्माचे अंधानुकरण आणि परंपरेच्या बेड्या झुगारून लेखन, कलासर्जन यासारख्या स्वअभिव्यक्तीतून स्त्री घडत जाते अन् प्रगतिपथावर चालू लागते!" असे विचार भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी ब्रह्मचैतन्य हॉल, बिजलीनगर, चिंचवड येथे रविवार, दिनांक १० जुलै २०२२ रोजी व्यक्त केले. स्वानंद महिला संस्था आणि श्री आनंद मंगल साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. सुरेखा कटारिया आणि डॉ. श्वेता राठोड या मायलेकींच्या 'लेखनरंग गुलुगुलु बोलू' या पुस्तकाचे आणि 'ढिंग चॅंग आनंदी आनंद' या बालगीतांच्या अल्बमचे प्रकाशन करताना डॉ. संगीता बर्वे बोलत होत्या. किशोर बालभारती (पुणे)चे संपादक किरण केंद्रे, ज्ञानप्रबोधिनी (निगडी)चे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, प्रा. राजेंद्र सोनवणे, स्वानंदच्या अध्यक्षा सुनीता बोरा, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन...